corona virus

बीड जिल्हा : ‘या’ तीन तालुक्यात कोरोनाचे शतक

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

दोन तालुक्यात अर्धशतक

बीड : जिल्ह्यात कोरोनाने आजही आज (दि.8) कहर केला आहे. तब्बल 711 कोरोना रूग्ण आढळून आल्याने नागरिकांतून भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचे तीन तालुक्यात शतक तर दोन तालुक्यात अर्धशतक झाले असून कोरोनाचा आकडा सातशे पार गेला आहे.

   जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 5 हजार 899 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 711 अहवाल पॉझिटिव्ह तर 5 हजार 188 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 158, आष्टी 102, बीड 189, धारूर 11, गेवराई 54, केज 45, माजलगाव 56, परळी 44, पाटोदा 22, शिरूर कासार 16, वडवणी 14 असे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना स्थिती गंभीर बनल्याचे स्पष्ट होते. रूग्णालयातील बेड्स देखील मिळणे कठीण होत चालले आहे.

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
Tagged