बीड

कोरोना चाचणीचा रिपोेर्ट आता लवकर मिळणार

By Karyarambh Team

April 17, 2021

ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम युध्दपातळीवरना. धनंजय मुंडे यांच्या पुढाकारावरून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सिजन प्लांट स्वाराती येथे शिफ्ट केला असून, याद्वारे जवळपास 290 ते 300 जम्बो सिलेंडर लिक्विड ऑक्सिजन एका दिवसात निर्माण होईल, त्यामुळे स्वाराती मध्ये आणखी ऑक्सिजन बेड वाढविता येणार असून हा प्लांट उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, अशी माहिती डॉ. सुक्रे यांनी दिली आहे.

150 बेड वाढविलेस्वाराती मध्ये उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, ना.मुंडेंच्या निर्देशानुसार 150 बेड वाढविण्यात आले आहेत तसेच आणखी 100 बेड वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

256 स्लाईस सिटी स्कॅन मशीनचा प्रस्ताव पाठवलास्वाराती ग्रामीण रुग्णालयात पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरात उपलब्ध असलेली अद्ययावत 256 स्लाईस सिटी स्कॅन मशीन बसवावी, ग्रामीण भागातील रुग्णांना त्यासाठी मोठ्या शहरात जायला लागू नये, यासाठी धनंजय मुंडे यांनी 256 स्लाईस सिटी स्कॅन मशीन खरेदीचा प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाला पाठवला असून, ही मशीन लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले आहे, अशी माहिती डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.