collector jagtap

बीडच्या निष्क्रीय जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा; ‘या’ नेत्याची शासनाकडे मागणी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : कोरोना काळात सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम जिल्हाधिकारी रवींद्र जगताप करत आहेत. त्यांनी तातडीची उपाययोजना न केल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे, त्यामुळे त्यांची तातडीने बदली करावी अशी मागणी आरोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र ओव्हाळ यांनी राज्य शासनाकडे शनिवारी केली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत नाही सर्वसामान्य कोरोना रुग्णांना तातडीने उपचार भेटत नाहीत. वारंवार रेमडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होत आहे. लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तसेच, ऐन संचारबंदीत रस्त्यावरील लोकांचा संचार वाढला आहे. यावर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे नियंत्रण राहिले नाही, त्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी डॉ.जितेंद्र ओव्हाळ यांनी केली. याबाबत आपण विभागीय आयुक्तांना सोमवारी भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच पुढे म्हटले की, रेमडीसिवीर इंजेक्शनचा घोळ तत्काळ न थांबल्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाच्यावतीने जिल्हा कचेरीवर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tagged