remdesivir

कोरोना अपडेट

रेमडेसिवीरच्या किंमत कमी करण्याचा निर्णय

By Karyarambh Team

April 17, 2021

मुंबई- रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची किंमत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार सात कंपन्यांना तसे आदेश बजावले आहेत. त्यानुसार आता 899 रुपयांपासून 3490 रुपयांपर्यंत या किंमती असणार आहेत. विद्यमान परिस्थितीत या इंजेक्शनची किंमत 1400 रुपयांपासून ते 5400 रुपयांपर्यंत आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे कोरोनावर उपचार घेणार्‍या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा लाभ होणार आहे. सध्या कोरोनातून बरे करण्यासाठी रेमडेसिवीर या इंजेक्शनचा वापर केला जातो. सध्या देशभरात याचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा काळाबाजार देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. काळ्या बाजारात हेच इंजेक्शन तब्बल 12 हजार रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत.