बीड दि.20 ः लॉकडाऊन केलेला महिना होत येत आहे. मात्र तरीही कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. मंगळवारी (दि.20) जिल्हा प्रशासनाला 4 हजार 108 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 24 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 84 जण निगेटिव्ह आले आहेत. बाधीतांमध्ये अंबाजोगाई 231, आष्टी 111, बीड 206, धारूर 50, गेवराई 45, केज 122, माजलगाव 50, परळी 101, पाटोदा 47, शिरूर 46 आणि वडवणी तालुक्यात 15 रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी