कोरोना अपडेट

पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता

By Shubham Khade

April 20, 2021

मुख्यमंत्री उद्या घोषणा करणार?

मुंबई : राज्यात पुन्हा 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता असून उद्या (दि.21) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील असे सांगण्यात येत आहे.

  ब्रेक द चेन अंतर्गत विविध प्रकारच्या आवश्यक बाबींना सुट देण्यात आली. त्यामुळे गर्दी रोखण्यात अपयश येत आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने कठोर पाऊले उचलण्यासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहू शकते असेही सांगितले जात आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले.