corona virus

कोरोना बाधितांचा आकडा वाढला!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड


बीड  दि.22 : कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थिती गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. गुरुवारी (दि.22) जिल्ह्यात 1 हजार 145 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
     आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.22) चार हजार 690 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 145 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 545 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये अंबाजोगाई 205, आष्टी 138, बीड 226, धारूर 43, गेवराई 116, केज 119, माजलगाव 65, परळी 77, पाटोदा 91, शिरूर 33 आणि वडवणी तालुक्यात 32 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

Tagged