corona virus

आजही कोरोना बाधितांचा आकडा हजारपार

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.24 :  कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थीत गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आली तरी आकडेवारी मात्र कमी होताना दिसत नाही. शनिवारी (दि.24) जिल्ह्यात 1 हजार 195 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाला शनिवारी (दि.24) चार हजार 398 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 195 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 203 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये अंबाजोगाई 194, आष्टी 201, बीड 208, धारूर 50, गेवराई 124, केज 130, माजलगाव 59, परळी 72, पाटोदा 65, शिरूर 58 आणि वडवणी तालुक्यात 34 रूग्ण आढळून आले आहेत

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

 

Tagged