remdesivir

कोरोना अपडेट

बीड जिल्ह्याला 900 रेमडेसिवीर इंजेक्शन प्राप्त

By Balaji Margude

April 28, 2021

echo adrotate_group(3);

550 लोकांची रेमडेसिवीरची यादी जाहीर

बीड- रेमडेसिवीर इंजेक्शनच्या प्रतिक्षेत असलेल्या बीड, गेवराई, आष्टी, शिरूरसाठी तालुक्यातील 550 रुग्णांची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. तर परळी, अंबाजोगाई, केज तालुक्यासाठी 300 तर फ्रंट वर्कर कर्मचार्‍यांसाठी 48 इंजेक्शन आणि इतर दोघांना 10 टक्के राखीव कोट्यातून 2 जणांना इंजेक्शन देण्यात आले आहेत. पहिल्यांदाच एवढी मोठी यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक एक इंजेक्शनचा हिशोब प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे या कामात आता पारदर्शकता आल्याचे नातेवाईकांनी बोलून दाखविले.echo adrotate_group(6);

यादीत बीड तालुक्यात विविध हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या 400, आष्टी तालुक्यासाठी 55, गेवराई 25, माजलगाव 55, शिरूर 15 असे 550 इंजेक्शनची यादी जाहीर झाली आहे. तर परळी, अंबाजोगाई, केजसाठी 300, फ्रंट वर्कर कर्मचार्‍यांना 48 तर प्रशासनाने आपल्या अधिकारात इतर दोघांना हे इंजेक्शन दिले आहेत.हे इंजेक्शन तालुका कार्यालयाच्या ठिकाणी तहसील कार्यालयातून प्राप्त करून घ्यावेत असेही उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणाहून तहसीलदारांनी हे इंजेक्शन तत्काळ घेऊन जावेत. व तहसीलदारांनी लवकरात लवकर यादी लावावी म्हणजे मंजूर इंजेक्शन नातेवाईकांना वेळेत मिळतील, अशी विनंती रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.echo adrotate_group(5);

तहसीलस्तरावर याद्या तयार करण्याचे काम सुरुबीडची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्या त्या तहसीलदारांना आपल्या तालुक्याच्या याद्या तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी आपआपल्या स्तरावरून प्रशासनावर दबाव तयार करून लवकरात लवकर याद्या प्रसिध्द करायला लावायला हव्यात.परळी, अंबाजोगाई आणि केजसाठी 300 इंजेक्शनपरळी, अंबाजोगाई आणि केज तालुक्यात उपचार घेणार्‍या रुग्णांसाठी 300 इंजेक्शन मंजूर करण्यात आले आहेत.echo adrotate_group(9);

बीड तालुक्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची यादी पहा…

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14

echo adrotate_group(1);