बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा गुरुवारी (दि.२९) उच्चांक झाला आहे. तब्बल १ हजार ४७० रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ४,९०२ नमुन्यापैकी ३,४३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात २१५, आष्टी १३३, बीड ३२०, धारूर ८४, केज १३१, गेवराई २००, माजलगाव ५२, परळी ११९, पाटोदा ७५, शिरूर कासार ८५, वडवणी ५६ असे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा हजारच्या आसपास असल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे.
तालुकानिहाय यादी