hrct scan

कोरोना अपडेट

बीडमध्ये सिटी स्कॅन स्कोर वाढविणारं रॅकेट?

By Balaji Margude

May 01, 2021

echo adrotate_group(3);

अबबऽऽऽ जिल्हा रुग्णालयात स्कोअर तीन अन् खासगी लॅबचा दहा

केशव कदम/ बीड

जिल्हाधिकार्‍यांनी घेतली गंभीर दखलदरम्यान हे दोन्ही रिपोर्ट घेऊन आम्ही जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे गेलो. त्यावेळी त्यांनाच हे दोन्ही रिपोर्ट दाखवून नेमका कोणता रिपोर्ट चूक आणि कोणता रिपोर्ट बरोबर हे आम्हाला सांगण्यात यावं, अशी विनंती त्यांना केली. त्यावेळी जिल्हाधिकारीही बचुकळ्यात पडले. त्यांनी लागलीच या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत.echo adrotate_group(6);

आर्थिक लूट आणि रुग्णांना जिवानिशी मारण्याचा प्रकारजेव्हा आम्ही जिल्हा रुग्णालयात महिलेचा एचआरसीटी तपासला तेव्हा तो 3 दाखवण्यात आला. तर शिवाजीराव या खासगी लॅबमध्येे छातीचा एक्सरे निल दाखवण्यात आला. तर त्यांच्याच युनिक अ‍ॅडव्हॉन्स्ड् सिटी इमेज येथे एचआरसीटी स्कोर हा चक्क दहा दाखवण्यात आला. जर जिल्हा रुग्णालयाचा रिपोर्ट चुकीचा असेल तर आतापर्यंत त्यांनी अनेकांना असेच चुकीचे रिपोर्ट देऊन जिवानिशी मारल्या प्रकरणी त्यांना जबाबदार धरायला हवे. आणि जर खासगी सिटीस्कॅनच्या रेडिओडायग्नोसीस यांचा रिपोर्ट बरोबर असेल तर त्यांच्याकडेच काढलेला छातीचा एक्स रे निल कसा आला? सरकारी रुग्णालय किंवा खासगी रुग्णालय या दोघांमध्ये कोणीतरी चुकीचं आहे हे सिध्द होईलच.तज्ज्ञ काय सांगतात?या क्षेत्रात काम करणार्‍या विविध तज्ज्ञांशी ‘कार्यारंभ’ने जेव्हा चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितले की जिल्हा रुग्णालयात आणि खासगी सिटीस्कॅनच्या रिपोर्टमध्ये 7 स्कोरचा फरक पडू शकत नाही. फार फार तर दोन स्कोरचा फरक आम्ही ग्राह्य धरतो. यात दोन्हीपैकी कुठल्यातरी एका मशिनचा रिपोर्ट चुकीचा येत आहे. आणि खासगी लॅब एचआरसीटी स्कोर 10 दाखवित असेल तर छातीच्या एक्सरेमध्ये संसर्ग आढळून यायला हवा होता. स्कोअर जर 3 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर एक्सरेमध्ये काही दिसत नाही तो निल येतो. पण इथे दहाचा स्कोर आलेला असल्याने छातीचा एक्स रे निल यायला नको होता, असेही तज्ज्ञ म्हणाले.echo adrotate_group(8);

दोन मशिनमधील रिपोर्टमध्ये कमी जास्त दोन अंकाचा फरक ग्राह्य आहे. परंतु इतका मोठा फरक अपेक्षीत नाही.echo adrotate_group(9);डॉ.संतोष जैन, ‘क्ष’ किरण तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय बीड

जिल्हा रुग्णालय किंवा युनिकने नुकसान भरपाई द्यावी -प्रा.बांगरचुकीचे स्कोर रिपोर्ट दाखवून रुग्णांच्या जिवाशी खेळले जात आहे. हॉस्पिटलचे डॉक्टर आणि खासगी सिटीस्कॅन सेंटरकडून रुग्नांची आर्थिक लूट केली जात आहे. जिल्हा रुग्णालयाची मशिन चुकीची असेल तर आजपर्यंत इथे कित्येकजणांचे जीव गेले आहेत. त्याला जिल्हा रुग्णालय जबाबदार असेल. आणि जर युनिकचे रिपोर्ट चुकीचे असतील तर आजपर्यंत इथून ज्यांनी ज्यांनी एचआरसीटी स्कॅन करून हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेतले त्या सगळ्यांची आर्थिक लूट झाली आहे. त्या सर्व रुग्णांच्या आर्थिक नुकसानीची युनिकने भरपाई करावी, सिटी स्कॅनचालक, मेडीकल चालक आणि डॉक्टर यांची खूप मोठी साखळी कार्यरत आहे असा आम्हाला संशय किंवा मग जिल्हा रुग्णालय गोरगरीबांच्या आरोग्याशी खेळत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजनचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी केली आहे.

एचआरसिटीचे खालील काही रिपोर्ट पहा…

जिल्हा रुग्णालयातून देण्यात आलेला हाच तो सिटी स्कॅन रिपोर्ट ज्यात स्कोर केवळ 3 दाखविण्यात आला होता.

जिल्हा रुग्णालयातून देण्यात आलेला हाच तो सिटी स्कॅन रिपोर्ट ज्यात स्कोर केवळ 3 दाखविण्यात आला होता.

शिवाजीराव बडे यांच्याकडे छातीचा एक्सरे काढला. त्यातही रिपोर्ट निल दाखवण्यात आला.

युनिक सिटीस्कॅन सेंटरमध्ये सीटीस्कॅन स्कोर चक्क 10 दाखविण्यात आला.

कार्यारंभचे आवाहनजिल्हाभरातील वाचकांना आम्ही आवाहन करीत आहोत की आपण जर आपल्या नातेवाईकांचा एचआरसिटी स्कॅन करणार असाल तर तो दोन वेगवेगळ्या खासगी सेंटरमध्ये करून बघा. किंवा एक सरकारी आणि दुसरा खासगीत एकाच दिवशी करून पहा. दोन्हीमध्ये जर दोन पेक्षा अधिक अंकाची तफावत आढळून आली तर आम्हाला 9404350898 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करा. जिल्हाभरात जर असे होत असेल तर ही लूट सुरु आहे हे निश्चित… echo adrotate_group(10);