न्यूज ऑफ द डे

बीड शहरात मोकाट फिरणार्‍यांना फटके!

By Keshav Kadam

May 03, 2021

बीड दि.3 : लॉकडाऊन असताना बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. सोमवारी (दि.3) दुपारी स्वतः पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोकाट फिरणार्‍यांवर कारवाई केली. तसेच त्यांची जाग्यावरच अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. तर काही मोकाटांना फटकेही देण्यात आले.          जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढतील संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. मात्र तरीही रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. शहरात दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी कडक कारवाईचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी शहरामध्ये मोकाट फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात आले. तसेच त्यांची अ‍ॅन्टीजेन टेस्टही करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासह शहर पोलीस ठाणे, शिवाजीनगर ठाणे, वाहतूक शाखेचे कर्मचारी, नगर परिषद, जिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अत्यावश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये असे अवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

 

अडीचशे तपासणीमध्ये 19 पॉझिटिव्हशहरातील महालक्ष्मी चौक, पेठबीड, माळीवेस, जिल्हा रुग्णालय परिसर आदी ठिकाणी मोकाट फिरणार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या. यावेळी अडीचशे तपासणीमध्ये 19 जण पॉझिटिव्ह आढळून आली. महालक्ष्मी चौकातील पॉईंटवर एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.