beed lock down

कोरोना अपडेट

बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊन; आता केवळ ‘हे’ सुरू राहणार

By Shubham Khade

May 04, 2021

जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

बीड : लॉकडाऊन असूनही जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आता लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने (दि.३) रोजी रात्री उशिरा आदेश जारी केले आहेत.

आदेशात म्हटल्याप्रमाणे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, (दि.५, ६, ७) या तीन दिवशी केवळ वैद्यकीय आस्थापना व पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. तसेच सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दूध विक्री तर दिवसभर गॅस विक्री करता येणार आहे. तर बँकांचे अंतर्गत कामकाज व शासकीय व्यवहार सकाळी १० ते १२ या वेळेत सुरू राहतील. शनिवार व रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत मांसाहार, किराणा, अन्नपदार्थ, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहतील. तसेच, याच दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत केवळ हातगाड्यावरून फळविक्री करता येईल, असे आदेशात म्हटले आहे.

1
2