Site icon कार्यारंभ लाईव्ह

बाजारात मोकाट फिरणाऱ्या तीन कोरोनाबाधितांवर थेट गुन्हा दाखल

echo adrotate_group(3);

कोविड केअर सेंटरमधून बाहेर पडणे अंगलट

बीड : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊन काळात विना परवानगी कोविड सेंटर बाहेर पडून मोकाट फिरणाऱ्या तीन कोरोनाबाधितांवर वडवणी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.echo adrotate_group(6);

कृष्णा शंकर राठोड (वय २९), नवनाथ जय राम राठोड (वय ४५), रामराव भीमा चव्हाण (वय ३५ सर्व रा.हरिश्चंद्र पिंपरी, ता.वडवणी जि.बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या कोरोनाबाधितांची नावे आहेत. हे तिघे बाधित असल्याने वडवणी शहराजवळील साळींबा रोडलगत असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये २७ एप्रिलपासून भरती झालेले आहेत. त्यांनी सेंटरवरील कार्यरत कर्मचाऱ्यांना काहीही न सांगता विना परवानगी बाहेर पडले. सेंटरवर परतले असता कर्मचाऱ्यांनी विचारपूस केल्यानंतर फळे खरेदी करण्यासाठी गेल्याचे स्पष्ट झाले. बाधित व्यक्तींना कोरोना संसर्ग व शासन आदेशाबाबत वारंवार सूचना देऊन व ज्ञात असूनही नियमांचे उल्लंघन केले. व समाजातील इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला. याप्रकरणी समुदाय आरोग्य अधिकारी दिपक गावडे यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथरोग अधिनियम १८९७ सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आसेफ शेख हे करत आहेत.echo adrotate_group(5);echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);

Exit mobile version