paithan corona possitive

कोरोना अपडेट

धक्कादायक; कोरोनाबाधितांच्या सहवासातून 560 जणांना लागण

By Shubham Khade

May 07, 2021

बीड, अंबाजोगाईत सर्वोच्च कहर

बीड : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली आहे. कडक निर्बंध लागू करूनही रूग्ण संख्या कमी होत नसून शुक्रवारी 1 हजार 314 नवे कोरोना रुग्ण निष्पन्न झाले. यातील धक्कादायक बाब म्हणजे 560 जणांना कोरोनाबाधितांच्या सहवासातून लागण झाल्याचे समोर आले आहे.

  जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4,112 नमुन्यापैकी 1,031 नमुने पॉझिटिव्ह तर 2,798 नमुने निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 242, आष्टी 42, बीड 419, धारूर 91, गेवराई 54, केज 100, माजलगाव 76, परळी 123, पाटोदा 66, शिरूर कासार 67, वडवणी 34 असे रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, एकूण बाधितांपैकी 50 टक्क्यांच्या जवळ आढळून आलेले रूग्ण हे बाधिताचे सहवासित असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासह कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे आरोग्य विभागासमोर आव्हान असणार आहे.