kirana dukan

कोरोना अपडेट

किराणासह अन्य दुकाने उघडण्यास मुभा, पण…

By Shubham Khade

May 08, 2021

बीड जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

बीड : जिल्हयात बुधवारपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. परंतू, रमजान ईद सणानिमित्त खरेदीसाठी किराणासह अन्य दुकाने उघडता येणार आहेत.

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज (दि.८) दिले आहेत. कडक लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आला आहे. आदेशानुसार, मंगळवार, बुधवारी जिल्ह्यातील किराणा, सुकामेवा, मिठाईची दुकाने त्या सोबतच चिकन, मटन विक्रीची दुकाने सकाळी ७ ते १० या वेळात उघडता येणार आहेत. दरम्यान, इतर निर्बंध पूर्वीप्रमाणे काय असणार आहेत.