corona

बीड जिल्ह्यात कोरोना अटोक्यात येऊ लागला!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : मागील आठवडाभरात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला. मात्र हळूहळू कोरोना बाधितांचा आकडा अटोक्यात येऊ लागला आहे. नागरिकांनी अजुन नियमांचे पालन करुन कोरोनाला हद्दपार करण्याची गरज आहे. गुरुवारी (दि.13) जिल्ह्यात 1 हजार 15 कोरोना बाधित आढळून आले.
आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.13) चार हजार 283 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार 15 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 238 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये बीड तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बीड-256 अंबाजोगाई 130, आष्टी 129, धारूर 60, गेवराई 91, केज 139, माजलगाव 51, परळी 45, पाटोदा 38, शिरूर 52 आणि वडवणी तालुक्यात 24 रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय यादी

Tagged