कोरोना अपडेट

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन

By Karyarambh Team

May 16, 2021

पुणे- काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक झालेली होती. ते कोरोनातून सावरत असतानाच, त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला असून, त्यांच्या शरीरात इन्फेक्शन देखील झाले होते. या सर्व कारणाने त्यांची प्रकृती नाजूक झाली होती मात्र त्यांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते.