corona virus

कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा हजारपार!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 :  काल दिलासादायक आकडेवारी समोर आल्यानंतर आज पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सोमवारी (दि.17) कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला असून जिल्ह्यात 1 हजार 118 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला सोमवारी (दि.17) चार हजार 403 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 1 हजार 118 जण बाधित आढळून आले. तर 3 हजार 285 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये बीड तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बीड-330 अंबाजोगाई 67, आष्टी 93, धारूर 80, गेवराई 86, केज 105, माजलगाव 96, परळी 35, पाटोदा 125, शिरूर 66 आणि वडवणी तालुक्यात 32 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

Tagged