क्राईम

नागापूर खून प्रकरणातील आरोपीला पिंपळनेर पोलिसांनी केले गजाआड

By Keshav Kadam

May 19, 2021

बीड दि. 19 : जुन्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालत दोन भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील नागपूर (खु.) येथे सोमवारी (दि. १७) रात्री ११ वाजता घडली होती. या प्रकरणातील आरोपीला पिंपळनेर पोलिसांनी बुधवारी गजाआड केले. राम साळुंके (५०) व लक्ष्मण साळुंके (४७) अशी यांचा खून करण्यात आला होता. १५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके याने दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती. तेंव्हा हा वाद आपसात मिटला होता; परंतु सोमवारी परमेश्वरने दोघांना फोनवरून शिवीगाळ केली. याबाबत त्याला समजवण्यासाठी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके गेले होते. यावेळी भररस्त्यात त्यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके, सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती घेत 24 तासाच्या आत आरोपीला गजाआड केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि. शरद भुतेकर, पोउपनि. सानप, पोह. सानप, पो.ह. खरमाटे, पो.ना.सुरवसे, पोशि कानडे, पो.शि कारले, पोशि. जाधव, पोशि. चांदणे यांनी केली.