eye drop

कोरोना अपडेट

डोळ्यात दोन थेंब टाका अन् ऑक्सिजन पातळी वाढवा औषध घेण्यासाठी लांबच लांब रांगा

By Karyarambh Team

May 22, 2021

echo adrotate_group(3);

हैदराबाद, दि. 22 : कोरोनात ऑक्सिजन पातळी घटल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनला लांबच लांब रांगा लागलेल्या आपण पाहील्या. परंतु आता तेही इंजेक्शन उपचार पध्दतील साथ देत नसल्याचे लक्षात आले. पण आता एक अत्यंत दिलासादायक बातमी आंध्रप्रदेशातून पुढे येत आहे. येथील एका वैद्याने डोळ्यात टाकायचे औषध बनवले असून ते डोळ्यात टाकले तर लगेच ऑक्सिजन लेवल वाढत असल्याचे सांगितले आहे. तसा अनुभव अनेकांनी घेतल्यानंतर आता हे औषध घेण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे.echo adrotate_group(6);

नाल्लोर जिल्ह्यातील कृष्णापट्टणम येथे एका वैद्याने ऑक्सिजनची पातळी वाढवणारं आणि कोरोनामधुन बरं करण्यासाठी औषध तयार केल्याचा दावा केला आहे. त्या वैद्याचं नाव आनंदय्या असं आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणतीही रक्कम मोजावी लागत नाही. शिवाय कोरोनासाठी हे औषध रामबाण असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. कोरोना विळख्यात सापडलेल्या आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्यांसाठी औषध गुणकारी असल्याचा दावा केला जात आहे. शिवाय औषध घेण्यासाठी शेजारील राज्यातील लोक देखील गर्दी करत आहेत. या औषधाचे 2 थेंब डोळ्यात टाकल्यानंतर शरीरातील ऑक्सिजन पातळी 83 वरून 95 होते, असा दावा केला जात आहे. हे औषध तीन प्रकारात आहे. कोरोना संसर्ग होऊ नये, झाल्यास तो बरा करणारे आणि ऑक्सिजन पातळी वाढविणारे असे तीन प्रकार आहेत. अशी माहिती आनंदय्या यांनी दिली शिवाय या औषधांसाठी एक रूपया देखील घेत नसल्याचं त्यांनी सांगितलं.औषधांची मागणी वाढल्याचं लक्षात येताचं, पोलिसांना औषधांचं वितरण थांबवलं आणि औषधांची योग्य चाचणी झाल्यानंतर औषधांचं वाटप करावं. असं सांगितलं. तसेच याप्रकरणी लोकयुक्तांकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. हे औषध घेतल्यानंतर एकाही रूग्णाने तक्रार केलेली नाही. आंध्रचे मुख्यमंत्री वाय.एस जगनमोहन रेड्डी म्हणाले की, औषधांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहोत. त्यासाठी अधिकार्‍यांनी औषधांचे वितरण आणि इतर पुरक बाबींसाठी अभ्यास करून योग्य पावले टाकावीत असे आदेश देण्यात आले आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्य नायडू यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. ’आयुष मंत्रालयाचे हंगामी मंत्री किरण रिजीजू आणि आयसीएमआर महासंचालक बलराम भार्गव यांच्यासोबत याविषयी चर्चा केली आहे. औषधांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेवू.’ असं उपराष्ट्रपती म्हणाले.echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);