Site icon कार्यारंभ लाईव्ह

धारूर बाजार समितीचे सभापती महादेव बडे यांचे निधन

echo adrotate_group(3);

धारूर : तालुक्यातील कासारी बोडखा येथील महादेव बडे यांचे रविवारी (दि.२३) पहाटेच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ वर्षे होते.echo adrotate_group(7);

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर ते औरंगाबादच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्याठिकाणी उपचारादरम्यान निधन झाले. आण्णा म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. ते धारूरसह वडवणी तालुक्यातील राजकारणात सक्रीय होते. स्व.गोपीनाथ मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. ते मुकादम असल्याने ऊसतोड कामगारांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क होता. कायम कामगारांसाठी त्यांनी लढा दिला. ते धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, कासारी बोडखा येथील सरपंच सुनंदा बडे या त्यांच्या पती तर उपसरपंच सदाशिव बडे हा मुलगा आहे. त्यांच्या निधनाबद्दल तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बडे कुटुंबियांच्या दुःखात कार्यारंभ ‘कार्यारंभ’ परिवार सहभागी आहे.echo adrotate_group(8);

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून श्रद्धांजली
echo adrotate_group(10);

Exit mobile version