corona virus

कोरोना अपडेट

टेस्ट वाढल्याने आकडाही वाढला!

By Keshav Kadam

May 23, 2021

बीड दि.27 : मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी हळूहळू कमी होताना दिसत आहे. रविवारी (दि.23) कोरोना बाधितांचा आकडा दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 962 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे.आरोग्य विभागाला रविवारी (दि.23) आठ हजार 929 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 962 जण बाधित आढळून आले. तर सात हजार 967 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये बीड तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बीड-268 अंबाजोगाई 64, आष्टी 83, धारूर 81, गेवराई 88, केज 89, माजलगाव 47, परळी 26, पाटोदा 78, शिरूर 109 आणि वडवणी तालुक्यात 29 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी