corona vaccine

कोरोना अपडेट

बीड जिल्ह्याला मिळाल्या २७,८४० कोव्हीशिल्ड लसी

By Shubham Khade

May 23, 2021

डीएचओ डॉ.राधाकिसन पवार यांची माहिती

बीड : कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत बीड जिल्ह्याला २७ हजार ८४० कोव्हीशिल्ड लसी मिळाल्या असून वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले की, उपलब्ध लस साठयानुसार स्वा.रा.ती.वै.म.व रु. अंबाजोगाई येथे १३००, जिल्हा रुग्णालय बीड १३००, उपजिल्हा रुग्णालय गेवराई, परळी, केज येथे प्रत्येकी ८००, ग्रामीण रुग्णालय माजलगाव, धारूर, पाटोदा, आष्टी येथे प्रत्येकी ५५०, ग्रामीण रुग्णालय तालखेड, चिंचवण, धानोरा, नांदुरघाट, रायमोहा, स्त्री रुग्णालय नेकनुर येथे प्रत्येकी ४००, प्रा. आ. केंद्र ग्रामीण, नागरी रुग्णालये, पोलीस हॉस्पीटल येथे प्रत्येकी ३२० या प्रमाणे उपलब्ध २७,८४० कोव्हीशिल्ड लसीचे जिल्ह्यात वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे आज (दि.२४) सर्व प्रा.आ.केंद्र, नागरी रुग्णालये, पोलीस हॉस्पीटल, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय बीड, स्वा.रा.ती. वै.म.व रु. अंबाजोगाई येथे ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांसाठी पहील्या डोसकरीता लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहेत. Ezee app वर नोंदणी केलेल्या नागरीकांना SMS / Whatsapp messages दवारे नागरीकांना लसीकरणाकरीता बोलावण्यात येत आहे. ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या जास्तीत जास्त नागरीकांनी Ezee app वर नोंदणी करुन लसीकरणाकरीता टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा, टोकन क्रमांकानुसार प्राप्त मेसेज नुसार लसीकरण करावे, मेसेज नुसार लसीकरणाकरीता न आल्यास परत टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा लागेल. ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या जास्तीत जास्त नागरीकांनी घरबसल्या Ezee app https:ezee.live/Beed-covid19-registration या लिंकवर कोविड वर लसीकरणाकरीता नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी केले आहे.