Corona

आजचा आकडा अत्यंत दिलासादायक!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.25 : मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. मंगळवारी (दि.25) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 749 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे.
आरोग्य विभागाला मंगळवारी (दि.25) पाच हजार 318 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 749 जण बाधित आढळून आले. तर चार हजार 569 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये बीड तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बीड-210 अंबाजोगाई 44, आष्टी 97, धारूर 58, गेवराई 69, केज 83, माजलगाव 45, परळी 26, पाटोदा 45, शिरूर 50 आणि वडवणी तालुक्यात 22 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

Tagged