corona

आजचा आकडा अत्यंत दिलासादायक!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : मागील चार दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. 1 हजार 500 च्या पुढे गेलेला बाधितांचा आकडा आता हजाराच्या आत येत आहे. गुरुवारी (दि.27) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 603 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे.
आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.27) पाच हजार 588 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 603 जण बाधित आढळून आले. तर 4 हजार 985 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये बीड तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बीड-165 अंबाजोगाई 55, आष्टी 79, धारूर 30, गेवराई 58, केज 65, माजलगाव 50, परळी 12, पाटोदा 26, शिरूर 49 आणि वडवणी तालुक्यात 14 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

Tagged