corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : आज ५१६ पॉझिटिव्ह

By Shubham Khade

May 31, 2021

बीडमधील संसर्ग आटोक्यात येईना

बीड : जिल्ह्यात सोमवारी (दि.३१) कोरोनाचे ५१६ रुग्ण आढळून आले आहेत. परंतू, बीड तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दरदिवशी सर्वाधिक असून संसर्ग कमी होताना दिसून येत नाही, यात सर्वाधिक रुग्ण शहरातील आहेत.

जिल्ह्यातून रविवारी ४२०० जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.३१) प्राप्त झाले, त्यामध्ये ५१६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३६८४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक २१८, अंबाजोगाई १८, आष्टी ५७, धारूर १४, गेवराई ४९, केज २२, माजलगाव २६, परळी ६, पाटोदा ५८, शिरूर २६ तर वडवणी तालुक्यात २२ रुग्ण आढळून आले. दरम्यान, प्रतिदिवस आढळणारी रुग्णसंख्या दीड हजारांवरून पाचशेच्या घरात आली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे.