namalgaon ganpati

दरोडा मंदिराच्या जमीनीवर; बीड शहरात बॅनरबाजी

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

भुमाफियांसह अधिकार्‍यांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी

बीड : तालुक्यातील नामलगाव येथील श्री गणपती मंदिराची 26 एकर जमीन परस्पर नावे करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी चौकशीचे आदेश देऊन दोन दिवस लोटले तरीही अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संतप्त भाविकांनी बीड शहरासह ग्रामीण भागात बॅनरबाजी करून निषेध व्यक्त करत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

नामलगाव प्रकरण हे तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रशांत शेकळे यांच्या काळापासून सुरु असल्याचे समोर आले आहे. यात खोड, मंडलिक नामक कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यातील एकास एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आले आहे. नामलगाव येथील श्री गणपती मंदिराची 26 एकर जमीन परस्पर नावे केल्याचा प्रकार उघडकीय येताच खळबळ उडाली होती. या प्रकारावरून ग्रामस्थांसह भाविकांतून संताप व्यक्त केला जात आहे. तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रशांत शेकळे यांच्यासह दोषी तलाठी, मंडळ अधिकारी व इतर कर्मचार्‍यांवर कारवाई गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ग्रामस्थांसह आशापुरक गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे.

Tagged