corona

कोरोना अपडेट

बीड जिल्ह्यात आज कोरोनाचे ‛इतके’ रुग्ण

By Shubham Khade

June 02, 2021

बीड : जिल्ह्यात बुधवारी (दि.२) कोरोनाचे ३७५ रुग्ण आढळून आले आहेत. जवळपास सर्वच तालुक्यातील संसर्ग कमी होताना दिसून येत आहे.

जिल्ह्यातून बुधवारी ३४७७ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२) प्राप्त झाले, त्यामध्ये ३७५ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३८५२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ७७, अंबाजोगाई २५, आष्टी ५४, धारूर ७, गेवराई ५१, केज ४२, माजलगाव २६, परळी १६, पाटोदा २८, शिरूर ३६ तर वडवणी तालुक्यात १२ रुग्ण आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होताच नागरिकांनी मास्कचा वापर कमी केला आहे.

..तर मिळू शकते 2 वाजेपर्यंत सवलतदोन दिवसांपूर्वी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 16 टक्क्यांच्या पुढे होता, मात्र आता तो देखील कमी होत आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत वेळ देण्यात आलेली आहे. मात्र पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांच्या आत आल्यास ब्रेक द चैनच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमानुसार बीड जिल्ह्यातही सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सवलत मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.