क्राईम

बंद देशी दारु दुकानातून दारुचे 25 बॉक्स चोरी!

By Keshav Kadam

June 03, 2021

बीड दि.3 ः शहरातील जालना रोडवरील एका देशी दारु दुकानातून 25 बॉक्स चोरी गेल्याचा प्रकार गुरुवारी (दि.3) समोर आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शहर पोलीसांनी दारु दुकानाची पाहणी करत पंचनामा केला. पंरतू लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद असल्यामुळे अधिक दाम घेऊन दारुची विक्री तर केली नसेल ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बीड शहरातील जालना रोडवरील सहयोग नगर भागात एक देशी दारुचे दुकान आहे. या दुकानातील देशी दारुचे 25 ते 30 बॉक्स चोरीला गेल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोनि.रवि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्ताफा शेख, तपास पथकाचे महेश जोगदंड, असलम पठाण, सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये दारुच्या दुकानातील बॉक्स अधिक दाम घेऊन विक्री तर केली नसतील ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण अशी जिल्ह्यात अनेक प्रकरणे उघडकीस आलेली आहेत.