न्यूज ऑफ द डे

पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, पण मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ

By Shubham Khade

June 05, 2021

echo adrotate_group(3);

मराठा नेते नरेंद्र पाटील यांचा खणखणीत इशारा

बीड : फडणवीस सरकारने मराठ्यांना दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक घालविले. आता कोरोना आहे म्हणून घरी बसायचं का? माझ्या बापाचे रक्त ज्यावेळी सांडले होते, तेव्हा मी माझ्या हाताने, आईने ते पुसण्याचे काम केले होते. अग्नी देताना मी प्रेत पाहिले. आम्ही जातीवंत, कट्टर मराठा आहोत, आम्ही शांत बसणार नाहीत वेळप्रसंगी पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, मात्र मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा खणखणीत इशाराच कै.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.echo adrotate_group(7);

बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती संघर्ष मोर्चादरम्यान ते बोलत होते. यावेळी आमदार विनायक मेटे यांची ही उपस्थिती होती. पुढे म्हटले आहे की, आम्ही कसं शांत बसायचं, कोरोना आहे तर असेही मराठ्यांचा मुडदा पाडलेला आहे. या काळात आम्ही चार लोक एकत्र आलो आणि चार मुडदे पाडले तर आम्ही कोणाच्या बापाला घाबरतोय का? असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. पुढे ते म्हणाले की, आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी ठराविक गटांनाच वेळ दिला. त्यावेळी आमदार विनायक मेटेंनी ही वेळ घेऊन आरक्षणाबाबत मुद्दे मांडले होते. परंतू, 9 सप्टेंबरला आरक्षण रद्द होताच, आम्हाला आमचा कार्यक्रम झाल्याचे समजले होते. मराठ्यांचा मुडदा पाडल्याचे सिद्ध झाले होते. जोपर्यंत आक्रमक होत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही हे लक्षात आले आहे. मराठा चळवळीचे नेतृत्व छत्रपती संभाजी राजे, आमदार विनायक मेटे यांच्यासारखे अनेक मावळे करतात. जितके मावळे तिकका जास्त आवाज होतो. त्यामुळे ही लढाई एकत्र लढू असे आवाहन पाटील यांनी केले. स्व.आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले. आजही लढा सुरुच असून आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे आरक्षणाची हत्या केली. आरक्षण समितीवर अशोक चव्हाण ऐवजी एकनाथ शिंदे या अभ्यासू नेत्याला स्थान द्या अशी मागणी केली होती. परंतू, त्याकडे कानाडोळा केला आणि घात झाला. आरक्षण चळवळीला बळ फडणवीस सरकारने दिले. महामंडळ, सारथी अशा विविध संस्थांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय दिला. आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर सरकार चिडीचूप बसले. आम्ही आवाज उठवल्यानंतर सरकारला जाग आली. वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ, पण न्याय मिळवू देऊ. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, कोणाच्या बापाला घाबरणार नाहीत. या मोर्चाला विरोध केला, त्यांचे आभार. त्यांच्या विरोधामुळेच गर्दी झाली. पाकीट घेऊन घरात बसणार्‍यांना लाज वाटली पाहिजे. यापुढे असाच मोर्चा काढा, प्रत्येक मोर्चात आम्ही सहभागी होणार आहे. तीन चाकी सरकारने आरक्षणाचे वाटोळे केले, त्यांचा सत्यानाश होणार, अशी टीका त्यांनी केली. राज्य सरकारकडून मागास आयोगाची समिती गठीत केली जात असून त्यात मराठा द्वेषी व्यक्तींचा समावेश आहे. त्याबाबतच्या अधिकृत शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे. यावरून राज्य सरकारच्या मनात पाप असल्याचे स्पष्ट होते, असा आरोपही पाटील यांनी केला आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);