केज

कोरोनाने पितृछत्र हरवले; बहिण-भावाचे वैद्यकीय शिक्षणाचे भवितव्य अधांतरी

By Shubham Khade

June 12, 2021

echo adrotate_group(3);

तुषार व प्रियंका शिंदे यांना आर्थिक मदतीची गरज

केज : तालुक्यातील होळ येथील सतीश शिंदे यांचे कोरोनामुळे गत महिन्यात निधन झाले. अचानक पित्याचे छत्र हरवल्याने वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या बहिण-भावाचे शिक्षण आता पैशाअभावी थांबवण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज असून सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी अर्थसहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.echo adrotate_group(7);

तुषार व प्रियंका असे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या बहिण-भावाचे नाव आहे. त्यांचे वडील सतीश शिंदे हे अल्पभुधारक शेतकरी होते. त्यांचा कारखान्याला मजूर पुरविण्याचा व्यवसाय होता. तसेच, ते शेतकरी संघटनांमध्ये चळवळीत सक्रीयपणे काम करत होते. 4 मे 2021 रोजी कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तुषार व प्रियंकासमोर वैद्यकीय खर्चाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. तुषार शिंदे हा हिंगोली येथे होमिओपॅथी शाखेचे दुसर्‍या वर्षांचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या चालू सत्राच्या परीक्षा सुरु असून तो शैक्षणिक कर्जासाठी धावपळ करत आहे. तर त्याची बहीण प्रियंका शिंदे ही पुण्यातील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दंतचिकित्सेच्या अंतिम वर्षात शिक्षण आहे. तिचे केवळ सहा महिन्यांचे शिक्षण पूर्ण करायचे बाकी आहे. परंतू, तिची अंतिम वर्षाची फीस 5 लाख 91 हजार इतकी आहे. दर महिन्याला लागणारा खर्च आणि फीसची रक्कम कुठून भरायची? असा प्रश्न आता सतीश शिंदे यांच्या पत्नी रेखा यांच्यासमोर उभा आहे. त्यांच्या पाल्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचे भवितव्य अधांतरी झाल्याने सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी अर्थसहाय्य करण्याचे आवाहन केले आहे.echo adrotate_group(5);

अर्थसहाय्यासाठी बँक खात्याबाबत माहितीआयडीबीआय बँक, शाखा अंबाजोगाई-खातेधारकाचे नाव : प्रियंका सतीश शिंदे-बँक खाते क्रमांक : 1451104000054597-आएफएससी कोड : IBKL0001451echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);