corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : आज १८० कोरोनारुग्ण

By Shubham Khade

June 12, 2021

जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढू लागली

बीड : जिल्ह्यात शनिवारी (दि.१२) कोरोनाचे १८० रुग्ण आढळून आले आहेत. गत दहा दिवसांतील दरदिवशीच्या तुलनेत आजचा आकडा वाढला आहे.

जिल्ह्यातून शुक्रवारी २९३९ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.१२) प्राप्त झाले, त्यामध्ये १८० नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर २७५९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात २४, अंबाजोगाई ५, आष्टी ३७, धारूर ७, गेवराई १७, केज ५८, माजलगाव ७, परळी ३, पाटोदा १९, शिरूर १० तर वडवणी तालुक्यात ३ असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, शासनाने जिल्ह्याचा अनलॉकच्या तिसऱ्या गटात समावेश केला असतानाच आता रुग्ण संख्या वाढू लागली आहे.