बीडमध्ये एसीबीच्या अधिकार्‍यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

बीड दि.14 : बीड एसीबी कार्यालयातील तत्कालीन पोलीस निरीक्षक हा लाचेची मागणी करत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी एसीबीच्या महासंचालक यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार करण्यात आली होती. अखेर या प्रकरणात सोमवारी (दि.14) त्या अधिकार्‍यावर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक हजार रुपयांची लाच घेताना एप्रिलमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधकरणच्या शाखा अभियंत्याला पकडले होते. या प्रकरणात आरोपी शाखा अभियंता शेख समद नुर मोहम्मद याला मदत करण्यसाठी एसीबीचा तत्कालीन पोलीस निरीक्षक राजकुमार पडावी याने दोन लाखाची लाच मागितली आणि त्यानंतर त्यांचा रायटर प्रदिप वीर याने 50 हजारात ‘डिल’ फिक्स केल्याची तक्रार एसीबीच्या महासंचालक कार्यालयाकडे करण्यात आली होती. जमिलोद्दीन शेख यांनी ही तक्रार दिली होती. या तक्रारीवर एसीबीच्या महासंचालक कार्यालयाने चौकशी केली. या चौकशीत लाचेची मागणी केल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्यानंतर सोमवार (दि.14) रोजी रात्री उशीरा एसीबी औरंगाबादचे पथक बीड शहरात दाखल झाले. या पथकाने राजकुमार पडावी आणि प्रदिप वीर याच्या विरोधातील तक्रार बीड शहर पोलीसाकडे दिली. त्यानंतर कलम 7,12 लाचलुचपत प्रतिबंधक 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत. ही कारवाई एसीबीचे प्रभारी अप्पर पोलीस अधिक्षक मारोती पंडित, पोलीस निरीक्षक विकास घनवट, पोलीस हवलदार राजेंद्र जोशी, मिलींद इप्पर यांनी ही कारवाई केली.

तलाठ्यासही केली होती एक लाखाची मागणी
तलाठी दादासाहेब आंधळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेवराई तालुक्यातील खळेगाव येथे कार्यरत असतांना ऑनलाईन सातबार्‍यांची शासकीय 240 रुपये शुल्कास लाचेत रूपांतर करून खोटा ट्रॅप केला. त्या गुन्ह्यात मदत करतो व पंचनामा देतो असे सांगून खुद्द बीड एसीबीचे पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली. एक तर खोटी कारवाई केली आणि पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केल्यामुळे संबंधित प्रकरणातील तलाठी आंधळे यांनी थेट पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे तक्रार करून पोलीस निरीक्षक पाडवी यांच्यावरच ट्रॅप लावण्याची मागणी केली होती. दरम्यान एसीबीचे प्रमुखांनी काहीच कारवाई न करता पाडवी यांना याबाबत माहिती दिली व पुढे पुरावा नाही असे कारण देऊन प्रकरण दाबले तरीही आंधळे यांनी संबंधितांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली होती.

Tagged