corona virus

कोरोना पुन्हा रिव्हर्स मोडवर

कोरोना अपडेट

बीड, दि.18- कोरोनाची आकडेवारी दररोज कमी जास्त होताना दिसत आहेत. काल जिल्ह्यात 224 रुग्ण आढळून आल्यानंतर आजच्या रिपोर्टकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. आजच्या रिपोर्टमधून जिल्ह्याला दिलासा मिळालेला असून आज कोरोनाने रिर्व्हर्स गिअर टाकल्याचे दिसत आहे. त्यानुसार आज केवळ 156 रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे आजच्या चाचण्यांची संख्या देखील 4483 इतकी जास्त होती.
मागील आठवड्यापासून कोरोना 200 च्या आत आला होता. 13 जून रोजी तर केवळ 108 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आता कोरोना उतरतीला लागला असे सगळ्यांना वाटत असतानाच गुरुवार दि. 17 जून रोजी कोरोनाने उसळी घेत तब्बल 224 पर्यंत मजल मारल्याने आरोग्य विभाग प्रचंड चिंतेत होता. आज पुन्हा एकदा जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.

खाली कोरानाचा जिल्हाभरातील रिपोर्ट पहा

Tagged