कोरोना अपडेट

कोरोनाचा आकडा कमी व्हायचे नाव घेईना

By Karyarambh Team

June 19, 2021

आजही आढळले मोठ्या प्रमाणावर रुग्ण

बीड, दि. 22 : जिल्ह्यातील कोरोना कमी व्हायचे नाव घेत नसून आजही रुग्णांचा आकडा वाढलेलाच दिसून येत आहे. शनिवारी प्रशासनाला 4571 जणांचे अहवाल मिळाले होते. त्यात 173 जण पॉझिटिव्ह आढळून आले.आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 29 रुग्ण हे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत. आज आढळलेल्यांमध्ये अंबाजोगाई 11, आष्टी 41, बीड 30, धारूर 12, गेवराई 13, केज 18, माजलगाव 11, परळी 4, पाटोदा 13, शिरूर 17, वडवणी 3 रुग्णांचा समावेश आहे.दरम्यान जगभरातील तज्ज्ञांनी भारतात दोन ते तीन आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकचुकलेला आहे.रुग्णांची यादी पुढीलप्रमाणे…