chandragrahan

जाणून घ्या आजचे चंद्रग्रहण तुमच्या राशीला कसे असेल?

महाराष्ट्र राशी भविष्य संपादकीय

बीड : आज होणारे छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण म्हणजे खगोलशास्त्रज्ञांसाठी ही पर्वणी आहे. रात्री सव्वाअकरावाजता ग्रहणाला सुरुवात होईल आणि उत्तररात्री अडीचच्या सुमारात चंद्र छायेतून पूर्ण बाहेर येईल. या ग्रहणाचा कोणत्या राशीवर काय परिणाम जाणवेल हे आपण पाहुयात.

मेष – चंद्रग्रहण आपल्या कुंडलीतील आठव्या स्थानी असेल. त्यामुळे आपल्याला आरोग्याची अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. तणामुक्त जीवन जगण्याकडे लक्ष केंद्रीत करा.

वृषभ– जोडीदारासोबत आपले संबंध अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गैरसमजापासून दूर राहा.

मिथुन– वादविवाद होणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक आहे. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

कर्क– आपल्या मनात नकारात्मक विचार वाढतील, परिणामी आपण ताणतणाव आणि थकवा जाणवेल. योग आणि व्यायामाची गरज आहे.

सिंह – भूतकाळातील समस्या त्रास देऊ शकतात. कौटुंबीक वाद सोडवण्यासाठी उत्तम वेळ. आरोग्याबद्दल अधिक जागरुक राहा.

कन्या- आपल्या आर्थिक जीवनावर सर्वाधिक परिणाम होईल. तुम्हाला काम पूर्ण करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे, यामुळे ते वेळेवर पूर्ण करण्यात तुम्हाला अपयशी ठरू शकतात.

तुळ- कामाच्या ठिकाणी आपल्याकडून चुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहून चतुराईनं काम करावं.

वृश्चिक- आपण आपल्या प्रतिमेबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आरोग्याबाबतही काळजी घ्या कारण वाहन चालकांनी गाडी चालवताना सावधगिरी बाळगा.

धनु- आपली परिस्थिती सुधारेल. वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. घाईनं गुंतवणूक करू नका.

मकर- हा वेळ आपल्यासाठी खूप शुभ असेल. व्यस्त असाल तरीही आपला वेळ चांगला जाईल. प्रिय व्यक्तींना वेळ देणं आवश्यक आहे.

कुंभ- अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. कोणतीही जोखीम पत्करू नका.

मीन- यावेळी तुमची कार्य क्षमता वाढेल, यामुळे तुम्ही तुमची सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यास सक्षम असाल