accident

क्राईम

दुचाकींचा समोरासमोर अपघात; चौघे जखमी

By Keshav Kadam

June 29, 2021

बीड दि.29: दोन दुचाकींचा सामोरासमोर झालेल्या अपघातात चोघे जखमी झाले आहेत. हा अपघात धुळे-सोलापूर महामार्गावरील महालक्ष्मी चौकात मंगळवारी (दि.29) सकाळी 11 च्या सुमारास घडला. या अपघातामध्ये दोन तरुण, एक महिला व मुलगा जखमी झाला आहे. येथील फारुख शेख, अशोक सुरवसे, विलास ढेरे यांनी तात्काळ जखमीना उपचारासाठी बीडमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. महालक्ष्मी चौकामध्ये सतत होणाऱ्या अपघातामुळे चौकात उड्डाणपूल करावा अशी मागणी होत आहे.