नेकनूर दि.30 : मांजरसुंबा घाटात मंगळवारी सकाळी बुलेटवर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मात्र हा अपघात नसून खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात समोर आले. यातील मुख्य आरोपी मयताचा मेहुण्यासह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अपघाताचा केलेला बनाव फसला असून 24 तासात नेकनूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.