क्राईम

महावितरण उपव्यवस्थापक बेडेकरला एसीबीचा झटका!

By Keshav Kadam

July 06, 2021

दहा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले बीड दि.6 : चौकशीमध्ये सहकार्य करण्यासाठी तक्रारदारास 11 हजार रुपयांच्या लाचेची राज्य विद्यूत विरतण कंपनीच्या उपव्यवस्थापकाने मागणी केली होती. तडजोडअंती 10 हजार रुपायांची लाच स्विकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 6 जुलै उपव्यवस्थापकास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुपाळ मधुकर बेडेकर (वय 51 रा.गिराम नगर पांगरी रोड बीड) असे अटक केलेल्या राज्य विद्यूत वितरण कंपनीच्या उपव्यवस्थापकाचे नाव आहे. त्याच्याकडे एका प्रकरणाची चौकशी सुरु होती. दरम्यान त्या चौकशी अहवालात सहकार्य करण्यासाठी बेडेकर याने 1 जुलै रोजी 11 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर 10 हजार रुपये स्विकारताना त्याला रंगेहात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर अधीक्षक मारुती पंडीत, उपाधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांच्या मागदर्शनाखाली पोनि.रविंद्र परदेशी, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, भारत गारवे, चालक मोरे यांनी केली.