न्यूज ऑफ द डे

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

By Shubham Khade

July 07, 2021

echo adrotate_group(3);

हिंदुजा रूग्णालयात सुरु होते उपचार

बीड : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले. आज (दि.7) सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 98 वर्षांचे होते.echo adrotate_group(7);

प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सिनेक्षेत्रतील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.echo adrotate_group(8);

या सिनेमांमध्ये केले कामदिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून 1944 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ अशा कितीतरी सिनेमांची नावे घेतला येतील. पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मुगल-ए-आजम’ मधील सलीमप्रमाणेच ‘देवदास’ चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो.echo adrotate_group(9);

‘किला’ ठरला अखेरचा चित्रपटदेवदास ही बंगाली लेखक शरतचंद्र यांची कादंबरी. बालमैत्रीण पारोवर प्रेम असूनही तिच्याशी लग्न न करता आलेला आणि त्यानंतर दारूच्या नशेत आकंठ बुडालेला, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पारोचा ध्यास घेतलेला ‘देवदास’ दिलीप कुमार यांनी ज्या तन्मयतेने रंगवला त्याला खरोखरच जवाब नाही. 1998 मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. echo adrotate_group(10);