corona

बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढला!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी (दि.८) कोरोनाचे १४८ रुग्ण आढळून आले आहेत. दरदिवशीच्या चाचण्यांच्या तुलनेत आजचा आकडा चिंताजनक आहे.

जिल्ह्यात बुधवारी ४०५५ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.८) प्राप्त झाले, त्यामध्ये १४८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३९०७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात १६, अंबाजोगाई ५, आष्टी ४६, धारूर ६, गेवराई ३५, केज १६, माजलगाव २, परळी १, पाटोदा १२, शिरूर ७, वडवणी २ असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, बाधितांचा वाढल्यास लॉकडाऊन लागू शकते, त्यामुळे वेळीच प्रशासन, जनतेने खबरदारी घेत नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

Tagged