न्यूज ऑफ द डे

खुषखबर! शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदील!!

By Karyarambh Team

July 08, 2021

बीड दि. 8 : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील, शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदं भरली जातील, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.

वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की, राज्यातील सुमारे 6100 शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भरती प्रक्रीयेच्या बंदीतून शिक्षण सेवकांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे मनापासून आभार असे म्हटले आहे.