corona

कोरोना अपडेट

बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिडशेच्या घरात

By Shubham Khade

July 09, 2021

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असून गुरुवारी (दि.८) कोरोनाचा आकडा दिडशेच्या घरात आहे.

जिल्ह्यात गुरुवारी ३८८३ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.९) प्राप्त झाले, त्यामध्ये १५३ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३७३१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात २७, अंबाजोगाई २, आष्टी ४१, धारूर ६, गेवराई १०, केज १४, माजलगाव ७, परळी २, पाटोदा २१, शिरूर १५, वडवणी ७ असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोरोनाचा आकडा वाढत असून वेळीच प्रशासन, जनतेने खबरदारी घेत नियमांचे पालन करण्याची गरज आहे.