‘स्टार महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संतोष सोहनींची निवड

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

बीड दि.10 : संकट काळामध्ये गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणारे उद्योजक तथा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी यांची मुंबई येथील संस्थेने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईत कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सोहनी यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

मुंबई येथील महाराष्ट्र सिनेमा महासंघ साईसागर इंटरटेनमेंट पनवेल सुर्योदय प्रतिष्ठान लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार महाराष्ट्राचा’ हा अतिशय मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष जनार्दन शिंदे यांनी संतोष सोहनी यांची निवड केली आहे. गेल्या पाच वर्षापासून या संयुक्त तिन्ही संस्था राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड करुन त्यांना हा पुरस्कार प्रदान करते. बीड येथील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तथा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी यांची कोरोना काळातील कार्याची दखल घेत त्यांची यावर्षीचा स्टार महाराष्ट्राचा या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मुंबईत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याबद्दल संतोष सोहनी यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Tagged