corona

बीड जिल्हा : आज कोरोनाचे १५७ रुग्ण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या गत चार दिवसांपासून वाढत असून रविवारी (दि.११) कोरोनाचा आकडा दिडशेच्या घरात आहे. कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

जिल्ह्यात शनिवारी ३९१५ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.११) प्राप्त झाले, त्यामध्ये १५७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३७५८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ३४, अंबाजोगाई ६, आष्टी ३३, धारूर ५, गेवराई २३, केज १४, माजलगाव २, पाटोदा २०, शिरूर ७, वडवणी १० असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोरोनाचा आकडा गत चार दिवसांत १०० वरून २०० वर गेला होता, आज हाच आकडा दिडशेच्या घरात आला आहे. त्यामुळे वेळीच कोरोना नियमांचे पालन करून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

Tagged