कोरोना अपडेट

माजलगावमध्ये गुरूवारी भव्य रक्तदान शिबीर

By Shubham Khade

July 14, 2021

आर्ट ऑफ लिव्हींग, सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळ, शिवाज्ञा प्रतिष्ठाणचा पुढाकार

माजलगाव : आर्ट ऑफ लिव्हींग परिवार, सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळ व शिवाज्ञा प्रतिष्ठाणच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि.15) शहरातील डक हॉस्पीटल, समता कॉलनी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सहभागी होवून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबीराचे उद्घाटन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार वैशाली पाटील, गटविकास आधिकारी प्रज्ञा माने भोसले, महावितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता सुहास मिसाळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले उपस्थित राहणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हींग परिवारासह सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळ, शिवाज्ञा प्रतिष्ठाण हे सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असते. त्याचाच एक भाग म्हणून संभाव्य रक्त तुटवडा लक्षात घेवून गुरूवारी (दि.15) सकाळी 10 वाजता शहरातील डक हॉस्पीटल, समता कॉलनी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी एकाच दिवशी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात आर्ट ऑफ लिव्हींगच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी सहभागी होवून, रक्तदान…जीवनदान ह्या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी रांजवण, मशिप्र मंडळाचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य विजयकुमार सोळंके, शिवाज्ञा प्रतिष्ठाणचे डॉ.सचिन डक, अतुल शेंडगे, आर्ट ऑफ लिव्हींगचे टीचर नंदकुमार शिंदे, महावीर मस्के, बाळासाहेब सोळंके, दत्त अर्बन निधीचे चेअरमन बाळासाहेब तौर, रोटरी क्लब सिटीचे सेक्रेटरी श्रीकृष्ण शेजूळ, नागडगावचे सरपंच विनायक कदम, संजय मेहता, माजलगाव बडमिंटन क्लबचे अध्यक्ष अशोक वाडेकर, शिक्षक पतसंस्थेचे संचालक प्रताप धपाटे, बाळासाहेब सोनार, सचिन फपाळ, प्रा.प्रदीप सोळंके, यशवंत सोळंके, भागवत शिंदे, गणेश घाटुळ, शुभमंगल बँकेचे व्यवस्थापक अभय भोसले, गणेश रांजवण, शरद सोळंके, सचिन वाकणकर, अक्षय साळवे, भारत मोगल, अशोक शिंदे, दत्ता फपाळ, परमेश्वर डाके, माधव सुरवसे, रामचंद्र आढाव, दत्ता गुळभिले, विकास उदावंत, दत्ता पंडीत, राम फपाळ, सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचे स्था.व्य.समिती अध्यक्ष अ‍ॅड भानुदास डक, अंगद मुळे, गोपाल कुलकर्णी, शिवाज्ञा प्रतिष्ठाणचे अनंत डक, रवी सोळंके यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हींग परिवार, सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळ व शिवाज्ञा प्रतिष्ठाणच्यावतीने करण्यात आले आहे.या रक्तदान शिबीरात सहभागी होण्यासाठी नंदकुमार शिंदे मो.9422063536, श्रीकृष्ण शेजुळ 9422243809, बाळासाहेब सोनार मो.9422424344, अशोक वाडेकर मो.9921809754, भागवत शिंदे मो.9422742749 यांच्याशी संपर्क साधावा.