क्राईम

बीडमध्ये अभिनेत्री करीना कपूर विरोधात तक्रार दाखल

By Keshav Kadam

July 14, 2021

बीड दि.14 : अभिनेत्री करीना कपूरने (kareena kapoor) ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र ग्रंथ बायबलचे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ (Pregnancy Bible.) या पुस्तकात वापरले आहे. यामुळे ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी शिवाजीनगर (shivajinagar police station) पोलीस ठाण्यात करीना कपूर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘प्रेग्नसी बायबल’ या पुस्तकात ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र ग्रंथ बायबलचे नाव वापरले आहे. यामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखविल्याबद्दल अभिनेत्री करीना कपूर विरोधात अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे, जिल्हाध्यक्ष मँथ्यू जोसेफ, नितीन शिंदे, ब्रदर अरूण गायकवाड, मरियन रेड्डी व किशोर पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात अल्पसंख्खाक मंत्री नवाब मलीक व अल्पसंख्यांक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. तक्रारीत तात्काळ 295-अ नूसार त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने करण्यात आलेली आहे.