Site icon कार्यारंभ लाईव्ह

जनतेच्या सेवेत दुसरा लोकनेता

echo adrotate_group(3);

स्व.यशवंतरावांपासून ते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांपर्यंतचा जो महाराष्ट्राचा इतिहास लिहीला गेला त्यात सुवर्ण अक्षरांनी सर्वसामान्य जनतेसाठी आपला देह झिजवणार्या मोजक्याच राज्यकर्त्यांच्या नावाची नोंद या महाराष्ट्राने घेतली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्राची जनता आपल्या डोळ्यात दुसरा लोकनेता म्हणून धनंजय मुंडे यांच्या रूपात पहात आहे. आज त्यांचा वाढदिवस, त्यामुळे त्यांच्या 25 वर्षाच्या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार, सुख-दुःखाचे प्रसंग अतिशय जवळून त्यांच्या सोबत अनुभवले, त्याचा संक्षिप्त रूपात आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहे.echo adrotate_group(7);

विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षापासून केलेली राजकारणाची सुरूवात आपले काका स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या सावलीत वावरताना नात्याने काका असले तरी पित्यापेक्षा जास्त प्रेम या चुलत्या-पुतण्यांचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. एखादा निर्णय स्व.पंडीतअण्णांचा धनंजय मुंडेंनी टाळला असेल पण स्व.मुंडे साहेबांनी दिलेला निर्णय आज्ञा म्हणून स्वीकारत असत, इतका विश्वास नेता म्हणून, माझा देव म्हणून मुंडे साहेबांवर ना.मुंडे साहेबांचा होता. आजही तीच भक्ती आणि प्रेम ना.मुंडेंचे स्व.मुंडे साहेबांवर आहे, म्हणून तर ज्या पक्षासाठी मुंडे साहेबांनी हाडाची काडे केली, शेटजी, भटजी चा म्हणून ओळखला जाणारा पक्ष सर्वसामान्यांचा केला, त्या पक्षाने स्व.मुंडे साहेबांसाठी काय केले? हे पहाण्यापेक्षा सत्तेत गेल्या बरोबर स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर महामंडळासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्या बरोबर जो पर्यंत साखर कारखाने अस्तित्वात असतील तो पर्यंत निधी कमी पडू देणार नाही, याची व्यवस्था विधिमंडळात करून घेणे यावरून आजही स्व.मुंडे साहेबांवरचे धनंजय मुंडे यांचे प्रेम व्यक्त होताना दिसते. याच काळात स्व.प्रमोदजी महाजन साहेब यांची चाणक्य निती ही धनंजय मुंडेनी आत्मसात केली. युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी साहेबांच्या ही मनात पुण्याच्या जाहीर सभेत चुणूक दाखवत घर करायला ना.मुंडे साहेब विसरले नाहीत. याच काळात नितीनजी गडकरी, एकनाथजी खडसे, पांडूरंगजी फुंडकर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सहवासातही त्यांना बरेच काही शिकता आले. संघर्षाचा वसा स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांकडून धनंजय मुंडे साहेबांनाच मिळाला आहे, हे कोणी नाकारू शकत नाही, ज्यांच्या मनात शंका असेल त्यांनी विरोधी पक्षनेते पदी असताना विधान भवनात केलेल्या भाषणांच्या चित्रफित उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील मुंडे-पवार हे वैर सर्व परिचित आहे. पण नियतीने ना.धनंजय मुंडेंचे नशीब लिहीताना मुंडे साहेबांच्या संगतीचा संघर्षाचे धडे गिरवतानचे नशीब लिहीतानाच नियतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबतची सत्ता जनतेच्या चरणी कशी समर्पित करावी हे धनंजय मुंडेंनी पवारांच्या घरी शिकावे, राजकारणातले डावपेच बारामतीच्या आखाड्यात शिकून एक परिपूर्ण लोकनेता या महाराष्ट्राला आणि भविष्यात देशाच्या सेवेत देण्यासाठी परमेश्वराला विनंती करायला नियती विसरली नाही, एवढे मात्र नक्की. कोविडच्या काळातही सरकार अडचणीत असताना सत्तेत आल्यानंतर बीड जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून आणलेला निधी धनंजय मुंडेंच्या शब्दाला महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मोठे वजन आहे हे सांगुन जातो. परळी विधानसभेच्या विकासासाठी सर्व सामान्य माणसाच्या भल्यासाठी सर्वस्व देण्याची तयारी असलेला लोकनेता या मतदार संघाला लाभले आहेत. त्याचे एक उदाहरण लॉकडाऊन मध्ये परळीचे भाजी मार्केट बंद राहिले शेतकर्यांनी थेट भाजीपाला घेवून धनंजयजी मुंडे साहेबांच्या पंढरी या निवासस्थानी 24 तास जनसेवेत असलेले जगमित्र कार्यालय गाठले. मग काय मुंडे साहेबांनी शेतकर्यांकडून सर्व भाजीपाला विकत घेतला व नगरसेवक कार्यकर्त्यांन मार्फत परळी शहरात मोफत वाटून टाकला. सत्ता व संघर्ष घेवून जनसेवेचा अखंड वसा स्व.पंडितआण्णा व स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विना सत्ता संघर्षाचा खेळ महाराष्ट्राच्या कुशीत व मुंडे-पवारांच्या मुशीत जनसेवेत धनंजय मुंडेच्या रूपाने दुसरा लोकनेता दाखल झाला आहे. एवढे मात्र नक्की असून, या लोकनेत्याला उदंड आयुष्य, चांगले आरोग्य लाभो हीच प्रभु वैद्यनाथ व ज्ञानोबारायांचे समकालीन संत परळी निवासी संत जगमित्र नागांच्या चरणी प्रार्थना.
-गोविंद महाराज केंद्रे,
मो.नं. : 9421337032
echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);

Exit mobile version