corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : कोरोना अडीचशेच्या जवळ

By Shubham Khade

July 21, 2021

लॉकडाऊननंतरही वाढतोय कोरोना

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.२१) कोरोनाचा आकडा अडीचशेच्या जवळ आहे. कोरोनाचा आकडा वाढत असल्याने वेळीच कोरोना नियमांचे पालन करून प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

मंगळवारी ५३७४ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२१) प्राप्त झाले, त्यामध्ये २३८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ५१३६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ३७, अंबाजोगाई ११, आष्टी ५७, धारूर १३, गेवराई ३३, केज १४, माजलगाव ७, पाटोदा ३६, शिरूर २१, वडवणी ९ असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, निर्बंध कडक करूनही कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.